लॉकडाऊनच्या काळातील वीज बिल भरणार नाही, असे ठणकावून सांगत महावितरणच्या मुख्य कार्यालयाच्या परिसरात कोल्हापूर परिमंडलाचे मुख्य अभियंता प्रभाकर निर्मळे यांच्यासमोर वीज बिल भरणार नाही कृती समितीने राज्य शासन व समिती व संताप व्यक्त केला. वीज बिल थकबाकीपोटी वीज कनेक्शन तोडण्याची मोहीम त्वरित थांबवावी. अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा समितीने दिला. या सरकारचं काय खाली डोकं वर पाय, वीज बिल माफी झालीच पाहिजे, वीज बिल माफ करा नाहीतर खुर्च्या खाली करा, भारतीय जनता पक्षाचा विजय असो, देणार नाही देणार नाही वीज बिल देणार नाही, या घोषणांनी परिसर दणाणून सोडला.